Breaking News

सरकारच्या अनागोंदी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांची माहिती

अहमदनगर/प्रतिनिधी। 31 :- अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या च्या वतीने दि.15 व 16 फेब्रुवारी 2018 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, अकोले, व कोपरगाव येथे केंद्र व राज्य सरकार च्या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस चे ’हल्लाबोल आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी राष्ट्र्रवादी भवन, अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये दिली.


यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी भवन, अहमदनगर येथे त्याच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन यावेळी करण्यात आले. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील याप्रसंगी म्हणाले कि, गेल्या 3 वर्षापासून सत्तेवर असलेले केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यावर सपशेल अपयशी ठरले आहे.अनेक पोकळ आश्‍वासने देऊन त्यांनी राज्याच्या जनतेची फसवणूक केली आहे.राज्यातील शेतकरी, युवक, विद्यार्थी, कष्टकरी, कामगार, लहान व्यावसायिक, शिक्षक व डॉक्टर अशा सर्वच थरामध्ये या सरकार बद्दल तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतीमालाचे घटलेले दर, इंधनाची दरवाढ व गस चे दरवाढ तसेच केंद्रातील सरकारच्या नोटबंदी व जी.एस.टी.च्या आताताई निर्णयामुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे याची केंद्र व राज्य सरकार ला जाणीव करून द्यावी अशा हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने या ’हल्लाबोल आंदोलन’ हाती घेण्यात आलेले आहे. अशी माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.जिल्ह्यातील सुमारे प्रत्येक हल्लाबोल आंदोलनासाठी किमान 15 ते 20 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या हल्लाबोल आंदोलनासाठी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने मोटर सायकल रलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी दिली यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रा.माणिकराव विधाते, सौ.मंजुषाताई गुंड, संजय कोळगे, शिवाजीराजे गाडे, प्राजक्त तनपुरे, अख्तर शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन, मनोगत व सुचना केल्या केल्या.
या हल्लाबोल आंदोलना साठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,खा.सुप्रियाताई सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजयजी मुंढे, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, दिलीपराव वळसे पाटील, जयंतरावज पाटील, आदीसह महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील आमदार माजी आमदार जिल्हा पदाधिकारी या हल्लाबोल आंदोलनास सहभागी होणार आहेत.