Breaking News

भीमा कोरेगाव हल्ल्याचे सूत्रधार भिडे, एकबोटे.

विश्‍वास नागंरे पाटील यांनी नेमलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून स्पष्ट.



 पुणे: भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट असून, हिंदू संघटनांनी हा हल्ला केला होता, असा सत्यशोधन अहवाल समन्वय समितीने दिला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विश्‍वास नांगरे पाटील यांनी ही समिती नेमली होती. त्या ठिकाणी हजर असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करावे. पोलिसांना ऑडिओ ,व्हिडीओ,फोटोजचे पुरावे देणार. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे हे आरोपी असून त्यांना अटक करावी यासंदर्भातले पुरावेही पोलिसांना देणार, असे या अहवालात म्हटले आहे.


तसेच मिलिंद एकबोटे यांनी किमया हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची तीस डिसेंबरलाच बैठक घेतल्याचे पुरावे समितीकडे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगाव इथे 1 जानेवारी रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक आणि जाळपोळीत झाले. 

सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणार्‍या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटले.