Breaking News

नववर्षोत्सवासाठी राहुल गांधी गोव्यात.


पणजी : आई सोनिया गांधी यांच्यासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी रात्री गोव्यात दाखल झाले. गोव्यातील सागरी किनाऱ्यावरील वरका गावात २७ डिसेंबर रोजी सोनिया गांधी दाखल झाल्या होत्या. यानंतर एका खाजगी विमानाने रात्री उशिरा राहुल गांधी या गावात दाखल झाले. हा पूर्णत: खासगी दौरा असून, या दरम्यान काँग्रेस अध्यक्ष पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना भेटणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.