Breaking News

नक्षलवादी तरुणांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी एसटी योगदान देईल – दिवाकर रावते .


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना सुरुकरण्यासंदर्भात माहिती दिली. एका शिवसैनिकाची नक्षलवाद्यांकडून हत्या झाली असता त्यांनीगडचिरोलीतील त्या संबंधित भागास भेट दिली होती, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.नक्षलवादी तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी एसटी महामंडळयोगदान देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांचे योगदानफार मोठे असते. त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटेसे योगदान देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेशहीद सन्मान योजना सुरु करीत असल्याची घोषणा यावेळी मंत्री श्री. रावते यांनी केली.
यावेळी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाखरुपयांचा धनादेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्तेमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, गृह राज्यमंत्री दीपककेसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदारवारिस पठाण, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधानसचिव मनोज सौनिक, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल आदी मान्यवरउपस्थित होते.