Breaking News

गरिबी निर्मूलनाची ताकद तंत्रज्ञानामध्ये - डॉ. विवेक सावंत

नाशिक, दि. 21, जानेवारी - अध्यात्म, राजकारण, प्रशासन या कशामुळेच न संपलेला गरिबी निर्मूलनाचा प्रश्‍न सोडविण्याची ताकद विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये असल्याचे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय प्रमुख डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये आयोजित डॉ नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेतील 49 वे पुष्प डॉ सावंत यांच्या व्याख्यानाने गुंफले. कुसुमाग्रज स्मारकात ही व्याख्यानमाला झाली. 

जगातील 25 टक्के गरीब भारतात असल्याने, दारिद्र्य निर्मूलन ही भारताचाच प्राथमिकता आहे, असे डॉ सावंत यावेळी म्हणाले. तंत्रज्ञानाच्या आधारे शेती, रोजगार, शिक्षण, माती तपासणी, जलसंवर्धन, कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासारख्या विविध प्रश्‍नांवर मोबाईल आपच्या सारख्या सुलभ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रश्‍न सोडवल्याचे प्रकल्प त्यांनी सहोदरण मांडले. ब्राह्मदेशापासून ओरिसापर्यंत आणि पंढरपूर पासून बीड पर्यंतच्या गावांमध्ये उभे केलेले सोपे वॉटर फिल्टर, मोजणी यंत्र, माती परीक्षण, पीक संरक्षण असे अनोखे आणि यशस्वी प्रकल्प सांगितले. शिक्षण, आरोग्य, शेती या सर्व प्रश्‍नांवर तंत्रज्ञानाने उत्तर शक्य, मात्र ते प्रश्‍न ओळखण्याची पहिल्यांदा गरज असल्याचे त्यांनी मांडले. आ र्थिक विकासातून देशातील काही निवडकांचाच विकास होतो, मात्र गरिबांचे प्रश्‍न गुंतागुंतीचे बनले असताना, आर्थिक विषमतेची दरी भीषण बनली असताना तंत्रज्ञान हेच जगातील आणि भारतातील गरिबी निर्मूलनाचे एकमात्र साधन असल्याचे त्यांनी सांगितले. 
प्रगती अभियान या संस्थेतर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने उमा घोसपुरीकर यांनी संस्थेचा परिचय करून दिला तर वसंत एकबोटे यांनी दाभोलकर व्याख्यानमालाची माहिती दिली.