Breaking News

आत्मा मालिक’मध्ये शिक्षणाबरोबर सुसंस्कार : पाटील


कोपरगांव ता. प्रतिनिधी :- शिक्षणासाठी मोठया शहरात जाणारी पिढी आज पहायला मिळते. मात्र आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये उच्च दर्जाचे अत्याधुनिक शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे ही संस्था ग्रामीण भागात असूनही येथे विद्यार्थी संख्या प्रचंड आहे. या विद्यार्थ्यातील स्वयंशिस्तीने भारावून गेलो. विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबरच ते सुसंस्कार आत्मा मालिकमध्ये रूजविले जातात, असे प्रतिपादन शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील यांनी केले. 
आत्माविष्कार स्नेहसंमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ रचना मालपाणी, संत देवानंद महाराज, उद्योजक अविनाश कुदळे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, अर्चना करपुडे, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, वसंतराव आव्हाड, व्यवस्थापक हिरामण कोल्हे आदी उपस्थित होते.