संतांच्या वाणीचा प्रभाव बुद्धीपेक्षा मनावर जास्त व्हायला हवे - प्रवचन शिरोमणी मणिप्रभाजी म.सा.
त्यांनी सांगितले की ,मनुष्य पुण्यचा उदयाला आपल उदय मानत आहे. परंतु तसे नसून ही बाह्य सुख तुम्हाला जीवनात तारू शकत नाही. तर अध्यात्मच तुम्हाला तारू शकते बाह्य जगाचा फोटो काढा आणि विचार करा यातील किती व कोणत्या गोष्टी तुमच्या सोबत येतील. त्यासाठी अध्यात्मात सहभाग असू द्या व्यापार,नोकरी , या गोष्टीत आपण आठ तास वेळ देत असतो तसे देवाचे भजन करण्यासाठी एक तास तर द्या मी कोण आहे ? यांचा प्रामाणिकपणे विचार केला तर आपले उत्तर आपल्याच मिळेल देवाने शरीराची रचना वेगवेगळ्या तयार केल्या आहेत. मात्र या जगातल प्रत्येक जीव आपले भाऊबंध आहे. ही भावना असायला हवी मनुष्य जीव बाह्य वस्तूचा आधीन झाला आहे. परंतु शाश्वत सुख पाहिजे असेल तर परमार्थशी नाते जोडले पा हिजे श्रीमंतीत माजू नका आणि गरिबीत घाबरू नका त्रासात वंदन करणे शिकला तर मनुष्याचे जीवन सुधारेल असे अनेक दाखले देत अध्यात्माचे मनुष्य जीवनात किती महत्व आहे हे पटवून दिले यावेळी सुधर्म आराधना भवनला समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.