Breaking News

पाणी अंगावर पडल्याने ऊसतोड मजुराच्या मुलांचा होरपळून मृत्यू

बीड, चुलीवर ठेवलेले पाणी अंगावर पडल्याने ऊसतोड कामगाराच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बंजारा नगर भागातील ही घटना आहे. वैष्णव (वय 6 वर्ष) आणि वैभव (वय 3 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत.


मृत मुलांची वडिल विजय जाधव हे शहरातील बंजारा नगर भागातील ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोडणीसाठी ते पत्नीसह कर्नाटक राज्यात आहेत. त्यांची मुले आजी-आजोबांक डे राहतात. आंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करण्यास ठेवले होते. थंडीमुळे चुलीजवळ बसलेल्या या दोन मुलांच्या हे गरम पाणी अंगावर पडल्याने दोघांचाही होरपळून मृत्यू झाला.