गोपाळ गोविंद यांच्या समाधीस्थळाची नासधूस
पुणे, - शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील गोपाळ गोविंद यांच्या समाधीवरील छत व समाधीकडे जाणार्या फलकाची नासधूस करण्यात आली होती. याप्रक रणी गावातील 49 जणांवर अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी घटनास्थळी दाखल होत याप्रकरणी हस्तक्षेप केल्याने दोन समाजातील संघर्ष टळला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाला गोपाळ गोविंद यांनी अग्नी दिला होता.
शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी 1 जानेवारीला पेरणे येथे होणार्या विजयस्तंभसाठी वढू येथे 29 तारखेला शांतता बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वी गावातील क ाही तरुणांनी गोपाळ गोविंद यांच्या समाधीसह फलकाचे नुकसान केले.या घटनेनंतर गावात विविध मागासवर्गीय संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्रापूर पोलिसांचे पथक हजर झाले. जिल्हा पोलीस ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक हे रांजणगाव पोलीस पथक व दंगल नियंत्रण पथकासह दाखल झाले.
यावेळी हक यांनी सर्वांशी चर्चा केली. मागासवर्गीयांची स्वतंत्र बैठक घेऊन, दोषींवर अॅट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. याबद्दलची पुढील बैठक 4 जानेवारीला होणार आहे. या बैठकीला दलित कोब्रा, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिक सेना, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.