Breaking News

‘अमृतवाहिनी’ला मैदानी स्पर्धेत विजेतेपद


संगमनेर प्रतिनिधी :- येथील अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत विजेतेपद मिळविले, अशी माहिती प्राचार्य व्ही. बी. धुमाळ यांनी दिली. डॉ. विखे पाटील तंत्रनिकेतन लोणी येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून विविध तंत्रनिकेतन व डी फार्मसींनी स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये अमृतवाहिनी तंत्रनिकेतचा १०० मीटर धावणे या स्पर्धेत राहुल आंबेकर प्रथम तर श्रीयश माने यांने व्दितीय क्रमांक मिळविला. २०० मीटर धावणे या स्पर्धेत श्रीयश माने प्रथम, ४०० मीटर धावणे स्पर्धेत सुमित आव्हाड प्रथम, ८०० मीटर आणि १ हजार ५०० मीटर धावणे स्पर्धेत भाऊसाहेब दराडे याला प्रथम क्रमांक मिळाला. गोळाफेक स्पर्धेत ओकार उंदावंत तर लांबउडी स्पर्धेत श्रीश माने प्रथम, १०० मीटर ४ रिलेमध्ये अमृतवाहिनी तंत्रनिकेतन संघ विजयी झाला. या विजयी संघाची व विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य इंटर झोनल स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. सुनिल सांगळे आदींचे मार्गदर्शन लाभले.