स्वच्छतेचे महिलांना देण्यात आले धडे प्रियदर्शनी महिला मंडळाचा उपक्रम
याप्रसंगी महिलांशी बोलतांना कदम म्हणाल्या, की देवळालीप्रवरा नगरपालिका स्वच्छता अभियानात सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिली आहे. सध्या नागरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियान- स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरु आहे. या अभियानात नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण केलेली तयारी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छता मार्गदर्शन तसेच ‘प्रश्न तुमचा उत्तर आमचे’ अशा अनेक योजना नगरपालिकेने राबविलेल्या आहेत.
यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती बेबी मुसमाडे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती सुजाता कदम, आरोग्य समिती सभापती नंदा बनकर, नगरसेविका संगिता चव्हाण, अंजली कदम, कमल सरोदे, केशर खांदे, उर्मिला शेटे, माजी नगराध्यक्षा इंदुमती खांदे, मंदाकिनी कदम, ज्योती त्रिभुवन, माजी नगरसेविका शुभांगी पठारे, बेबी बर्डे, ज्योती गिरमे, प्रमिला कोळसे, कार्यालयीन अधिक्षक सोफिया बागल, सविता हारदे, प्राजक्ता कोळसे आदी उपस्थित होत्या.
