Breaking News

‘सह्याद्री’मध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषद


संगमनेर प्रतिनिधी :-गुणवत्तापूर्वक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी येथील सह्याद्री महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने गुरुवारी दि. १ आणि २ फेब्रुवारी या कालावधीत अर्थशास्त्र विषयाची  आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. आर.के. दातीर यांनी दिली. या परिषदेसाठी मॉरिशस, नेपाळ, सिंगापूर या देशांमधून तसेच विविध राज्यातील व महाराष्ट्रातील जवळपास ४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परिषदेचे उदघाटन राज्याचे माजी शिक्षण मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या परिषदेला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अर्थशास्त्र विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.