Breaking News

जिल्हा परिषदेच्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात


अहमदनगर : प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग मिशनच्यावतीने ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी’अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध व लघुपट स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकतेच अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनित तुंबारे आदी उपस्थित होते.
१८ वर्षांखालील वयोगटाच्या निबंधस्पर्धेत आम्रपाली आंधळे हिला प्रथम क्रमांक मिळाला. १८ वर्षांवरील वयोगटाच्या निबंध स्पर्धेत जगन्नाथ आंधळे याला प्रथम तर लघुपट स्पर्धेत सचिन कलमदाणे व किरण बेरड यांना विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात निखील नगरकर व अपेक्षा डोके यांना विभागून प्रथम क्रमांकाचे तर कनिष्ठ गटात रूपाली गिरवले हिला प्रथम पारितोषिक मिळाले. विजेत्यांना रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धांसाठी सुभाष कराळे, सचिन थोरात, प्रशांत जगताप, दीपाली जाधव, मनोज सकट, किशोर म्हस्के, भागवत गोल्हार, अश्विनी ठुबे यांनी पुढाकार घेतला.