Breaking News

पढेगावला पल्स पोलिओ लसीकरण उत्साहात.


कोपरगांव ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील पढेगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण सरपंच प्रकाश शिंदे हस्ते करण्यात आले. ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना प्राथमिक उपकेंद्रात लसीकरण करण्यात आले. यावेळी परिचारीका बोर्डे, बाबासाहेब शिंदे, संतोष शिंदे, शिवाजी शिंदे, मुकुंद जाधव, रामकृष्ण शिंदे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.