Breaking News

समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी 10 जानेवारीला रास्ता रोकणार ; जळगावकरांचा निर्धार

जळगाव,  - जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्ते विस्तार या मागणीसाठी 10 जानेवारीस महामार्ग रोको करण्याचा दिलेला इशारा हा प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा निर्धार संस्था व संघटनांच्या प्रतिनिधी बैठकीत करण्यात आला. ही बैठक जळगाव समांतर रस्ते कृती समितीच्या पुढाकाराने कांताई सभागृहात झाली. 


कृती समितीने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती यावेळी देण्यात आली. आंदोलनाची पुढील दिशा काय असावी यावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यात माजी उपमहापौर करीम सालार, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, सामाजिक नेते गनीभाई मेमन, आयएमएचे डॉ. राजेश पाटील, मल्टिमीडिया फिचर्स प्रा. लि. चे सुशीलभाऊ नवाल, विनोद देशमुख, मनोज वाघ, स्वामी रेणापूरकर, ड. शिरीन अमरेलीवाला, सचिन नारळे, ललित चौधरी यांच्यासह इतरांनी सूचना केल्या.