Breaking News

‘आत्माविष्कार’ स्नेहसंमेलनाची जय्यत तयारी


कोपरगांव ता. प्रतिनिधी :- येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलच्या ‘आत्माविष्कार’ या स्नेहसंमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. हे स्नेहसंमेलन दि. २३ ते २६ जानेवारी दरम्यान आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे. ‘आत्माविष्कार’ या स्नेहसंमेलनाबाबत आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, की हे स्नेहसंमेलन म्हणजे फक्त गायन किंवा नृत्य सादरीकरण नाही. तर गायन, संगीत, नृत्य, मातकाम, चित्रकला, नाटय, निवेदन, अभिनय या सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार आहे. हे आत्माविष्कार स्नेहसंमेलन आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. विविध क्रिडा स्पर्धेत राष्ट्रीय, राज्य पातळीवर यश मिळविले.त्यांचाही गौरव सोहळा संपन्न होणार आहे. या स्नेहसंमेलनामध्ये आत्मा मालिकचे ८ हजार ५०० विद्यार्थी तसेच त्यांचे पालक सहभागी होणार आहे. स्नेहसंमेलन काळात पालकांची निवासव्यवस्था करण्यात आलेली आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.