Breaking News

विधानसभा बूथ प्रमुख प्रशक्षिण उत्साहात


श्रीरामपूर प्रतिनिधी :- पं. दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार अभियानातंर्गत भाजपचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात बुथ प्रमुख प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते, राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, नगरसेवक दिपक चव्हाण, नगरसेविका वैशाली चव्हाण, अभिजीत कुलकर्णी, हेमंत भालेराव, विस्तारक कैलास शिंदे, मदन चौधरी, बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे, सचिन ढोबळे, बाळासाहेब धनवटे, सतीष सौदागर, सुनिल दातीर, सुनिल दिवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बूथ प्रमुखांना बीजेपी महाराष्ट्र ऍप हाताळणी व त्याद्वारे बूथ प्रमुखांनी कशा पद्धतीने कार्य करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. चित्ते यांनी बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील बुथप्रमुख उपस्थित होते.