Breaking News

कमला मिल आग : दोन व्यवस्थापकांना पोलीस कोठडी


मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी ‘वन अबव्ह’च्या अटक करण्यात आलेल्या दोन व्यवस्थापकांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केविन बावा आणि लिस्बन लोपेज अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना भोईवाडा न्यायालयात आज हजर केले असता न्यायालयाने त्यांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी हे दोघेही घटनास्थळी हजर होते. मात्र, काही वेळानंतर नातेवाईकांच्या मदतीने ते दोघेही पळून गेले होते. ज्या नातेवाईकांनी त्यांना पळून जाण्यास मदत केली होती त्यांना अटक करून जामीन देण्यात आला आहे.