Breaking News

‘मेहरम’ प्रथा बंद करण्यास मुस्लिम बोर्डाचा विरोध


पुणे : मुस्लिम महिलांना एकट्याने हज यात्रेला जाता यावे, याकरता कायद्यात सुधारणा करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यावर ऑल इंडिया मुस्लिम पसर्नल लॉ बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे. मुस्लिम बोर्डाचे मौलाना अब्दुल हमीद अझारी म्हणाले, हा धार्मिक मुद्दा आहे. संसदेत पास करुन त्याचा कायदा बनवता येणार नाही. 99 टक्के पुरूष आणि मुस्लिम बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कोणी काय म्हणत आहेत यापेक्षा जास्त ते त्यांच्या धर्मगुरुंनी सांगितल्याप्रमाणे धर्माचे पालन करतात. महिलांनी एकट्याने 3 दिवसांपेक्षा जास्त किंवा 78 किमीपेक्षा अधिकचा प्रवास हा ’मेहरम’(पुरुष संरक्षक) शिवाय करु शकत नाही, असे इस्लाममध्ये म्हटले आहे.