राजपथावर अवतरणार ‘शिव राज्याभिषेक’
नवी दिल्ली : देशभरातून एकूण 29 राज्यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील फक्त 14 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणार्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिव राज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. चित्ररथ बांधणीसाठी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू दिल्लीत दाखल झाला आहे. यावर्षी 69 वा प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहे.
दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह गणमान्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलानात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे.
महाराष्ट्राच्या या चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात येणार असून शिवराज्याभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही साकारली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकारासह चित्ररथावर एकूण 10 कलाकार असतील. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा दर्शविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणार्या गीतांची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.