Breaking News

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा


अमरावती : वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत, आमदार कडू यांना 600 रुपये दंडही भारावा लागणार आहे. अचलपूर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.गेल्या वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आज शिक्षा सुनावण्यात आली. आमदार बच्चू कडू यांना 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यासोबत 600 रुपये दंडही भरावा लागणार आहे. 

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी मारहाणीचा आरोप फेटाळला होता. पोलिसांनी नीट वाहतूक नियंत्रित न केल्यामुळे त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. त्याबाबतचा जाब लोकप्रतिनिधी म्हणून विचारला होता. मात्र पोलिसांनी उद्धट उत्तरं दिली, त्यावेळी त्याच्यासोबत शाब्दिक वाद झाला, मात्र मारहाण झाली नव्हती, असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. इतकंच नाही तर वाहतूक पोलिसाने कर्तव्यात कसूर केल्यानेच परिसरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले, शिवाय अनेक अपघात झाले, असंही बच्चू कडू म्हणाले होते. बाचाबाची झाल्यानंतर पोलिसाने मारहाणीची खोटी तक्रार केली, असा आरोप बच्चू कडूंनी केला आहे.