सावंतवाडीत महास्वच्छता अभियानात गृहराज्यमंत्री सहभागी
सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने स्वछ सर्वेक्षण 2018 अंतर्गत शहरामध्ये रविवारी महास्वछता अभियान राबविण्यात आलं. सकाळी साडेसात वाजता नगरपालिकेच्या कक्षातील भों गा वाजवून या महास्वछता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. या स्वछता मोहिमेसाठी दीपक केसरकर स्वतः उपस्थित होते. या महास्वछता अभियानात शहरवासीय सुद्धा मोठ्या संख्येन सह्भागी झाले होते. एतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरामध्ये स्वच्छतेचा नारा देत सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने संपुर्ण शहरात महास्वछता अभियानच आयोजन करण्यात आले होते.
