Breaking News

जिल्हा बँकेच्या वेतन करारावर स्वाक्षर्‍या

सिंधुदुर्गनगरी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यातील अग्रगण्य बँक आहे. बँकेने सर्व क्षेत्रात प्रगती करत असताना नेट बँकिंग, शून्य टक्के छझ- ,40 ठिकाणी अद्यावत -ढच् सेंटर्स, 98 शाखा सुरु करून मिळवलेल यश भूषणावह आहे. जिल्हा बँकेच्या कारभारात विश्‍वासार्हता आणि पारदर्शकता आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या काळात या बँके ला कसलीच झळ पोहचलेली नाही. वेतन करार झाला आहे. 


आता जिल्हा बँक अधिकारी कर्मचारी अधिक जोमाने काम करून बँकेला प्रगती च्या शिखरावर पोहचवतील असा विश्‍वास बँक एम्प्लॉइज यूनियन अध्यक्ष तथा खासदार आनंदराव अडसूळ यानी एकता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्हा को - ऑप बँक एम्प्लॉइज यूनियनच्या वतीने सिंधुदुर्ग नगरीतील शरद कृषी भवन मध्ये एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .मेळाव्याचे उदघाटन खासदार अड़सूळ यांच्या हस्ते झाले. जिल्हा बँक राज्यात एक नंबर बनवण्यासाठी प्रयत्न करूया अस आवाहन खासदार आनंदराव अडसूळ आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी बँक कर्मचार्‍याना केल.