Breaking News

सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना रणशिंग फुंकणार


सांगली,  अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे नेते सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सोमवार दि. 8 जानेवारी रोजी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात महापा लिकेतील काही नगरसेवकांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिवसेनेचे युवा नेते नगरसेवक शेखर माने यांच्या पुढाकाराने येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दुपारी चार वाजता हा मेळावा होत आहे. गत दोन महिन्यापूर्वी सांगली जिल्हा दौ-यावर आलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी महापालिका निवडणूक ताकदीने लढविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शिवसेनेच्या दुस-या फळीतील नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रात मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.