अदिवासी भिल्ल समाजाचे विविध प्रश्नांसाठी उपोषण.
नेवासा/तालुका प्रतिनिधी/- तालुक्यातील पुनतगावातील अदिवासी भिल्ल समाजाचे दि. २५/१/२०१८ रोजी विविध मागण्यां संदर्भात जिल्हा परिषद अहमदनगर येथे उपोषण करणार आहेत.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनतगाव मधील अदिवासी भिल्ल वस्तीवर अंदाजे २५० ते ३०० लोकसंख्या असून या वस्तीवर अदयापही कुठल्याही सुख सुविधा उपलब्ध नसून वर्षानुवर्षे हा समाज मागासलेलाच राहिला. त्यांच्या विकासाकरीता शासनाचा भरपुर निधी येतो. पण ग्रामपंचायती कडून यांच्यावर अन्याय केला जातो.
त्यामुळे कित्येक वेळेस शासनास पत्रव्यवहार करूनही कुणी दखल घेतलेली नाही. तसेच भिल्ल समाजासाठी गावात अधिकृत दफनभुमी नसल्याने पुनतगावमधील भुदान यज्ञात मिळालेली स.न.२३/२ या क्षेत्रातील सरकारी जमिन दफनभुमीसाठी मिळावी व दफन भुमीसाठी समाजकल्याण व अदिवासी विकास मार्फत त्वरीत निधी मिळावा.तसेच पुनतगावमधे अंदाजे ५६ लाख रू.खर्च करून मोठी पिण्याची पाण्याची टाकी व गावात व इतरत्र पाईपलाईनही झालेली असुन अदिवासी भिल्ल वस्तीवर एक वर्षापासुन राजकिय आकसेपोटी जाणुनबुजुन पाईपलाईन अर्धवट ठेवून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले. व भिल्ल समाजाच्या वस्तीवर बसविलेल्या सौरदिव्याची बँटरी ग्रामपंचायतीने जाणुनबुजून काढून नेलेली आहे. तसेच ज्या अदिवासी भिल्ल बांधवांना स्वताच्या हक्काच्या जागा नाही त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे अशा लोकांना ग्रामपंचायतीची गावठाण जमिन स.न. ९२/१,९२/२ या क्षेत्रात प्लाँट पाडून त्यांना जागा देवून ग्रामपंचायत दप्तरी नोंद लावून शासनाकडून त्यांना घरे बांधुन मिळावी .
अदिवासी समाजाकडे ग्रामपंचायतीने जाणुन बूजून दुर्लक्ष केल्याने या प्रश्नांसदर्भात उपोषण आंदोलन व लेखी तक्रारी करूनही संबंधीतांनी कार्यवाही न केल्याने २५ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अहमदनगर यांच्या दालनासमोर अदिवासी भिल्ल समाजासह ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत.
याबाबत लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. , जिल्हाधिकारी , जि.पोलीस अधीक्षक अ.नगर , गटविकास अधिकारी प.समिती , तहसिलदार नेवासा यांना दिलेले असून त्यात नमूद केले आहे की वरील मागण्या दि. २४ जानेवारी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दि.२५ जानेवारीस उपोषणास बसू व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनाची राहील.या निवेदनावर ग्रा.स.मिना बडेँ, उज्वला वाकचौरे, अनिता राक्षे, अलका बडेँ, संगिता बडेँ, अलका पवार, दिपक धनगे, संजय गंधारे, त्रिंबक वाकचौंरे, शिंदे प्रमोद, बाबुराव काळे, अशोक वाकचौरे, विलास वाकचौंरे, शिवाजी वाकचौरे,अनिल गंधारे इत्यादिंच्या सहया आहेत.