बीड व उस्मानाबाद जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याबद्दल बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सत्कार
यावेळी श्री. लोणीकर म्हणाले की, दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने उत्तम काम केले आहे. हे काम उत्कृष्टरित्या झाले आहे. परंतु यावरच न थांबता अजून काम करायला हवे. यापुढे बेसलाईन सर्वेच्या पुढे जाऊन शौचालय बांधण्याचे काम करावे. जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते. यासाठी दक्ष राहून अधिक काम करणे आवश्यक आहे. लोकांनी शौचालयाचा वापर करावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. कीर्तनकारांचे तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत त्यांच्या मदतीने समाजात प्रबोधन करावे. महाराष्ट्र मार्च 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार उर्वरित जिल्ह्यातही काम सुरु आहे. इतर जिल्ह्यानेही उद्दिष्ट पूर्ण करावे.
यावेळी बीड जिल्ह्याच्या प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविताताई गोल्हार यांचे मंत्री श्री. लोणीकर व मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलथे यांचा श्री.लोणीकर व अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
