Breaking News

शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करावे - बबनराव लोणीकर


जालना जिल्ह्यातील लोणार ते मंठा व वाटूर ते लोणी मंजूर (शेगाव ते पंढरपूर) पालखीमार्ग या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार आणि नियोजित वेळेत करावे. रस्त्याचे प्रत्यक्ष काम 80 फुटापर्यंत करावे, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केल्या.

शेगाव ते पंढरपूर या महामार्गाचे जालना जिल्ह्यातील कामाचा आढावा पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी आज मंत्रालयात घेतला. या आढावा बैठकीस जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री.गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. चव्हाण, सहाय्यक अभियंता उदय वर्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.