मदुराई : तामिळनाडूच्या तुतीकोरिन जिल्ह्यातील एका महामार्गावर बुधवारी सकाळी एका अनियंत्रित प्रवासी वाहनाचा अपघात झाल्याने मध्य प्रदेशातील २ महिलांसह ६ पर्यटक ठार, तर ५ जण जखमी झाले. मध्य प्रदेशातील पर्यटक एका वाहनातून कन्याकुमारीला जात असताना मदुराईपासून १४० किमी अंतरावरील कायातारू गावाजवळ भरधाव वाहनाने रस्त्यालगतच्या कठड्याला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. वाहनचालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशचे ६ पर्यटक ठार.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:28
Rating: 5