Breaking News

सेल्फीच्या नादात माय-लेकाला जलसमाधी.


कोरापूट : सेल्फी घेण्याच्या नादात नदीत बुडाल्याने माय-लेकाला जलसमाधी मिळाल्याची घटना ओडिशाच्या रायगड जिल्ह्यात मंगळवारी घडली. सायंकाळच्या सुमारास रायगड शहराजवळील नागाबाली नदीतील एका खडकावर उभे राहून जे. शांती(३०) ही महिला मुलगा जे. अकिल(५) व मुलीसोबत मोबाईलद्वारे सेल्फी घेत होते. यावेळी पाय घसरून तिघेही नदीत पडले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीला वाचविण्यात यश आले..