कानपूर : आठवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्याथ्र्याने पित्याच्या रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात मंगळवारी खळबळ उडाली. सायंकाळच्या सुमारास शहरातील अशोकनगर भागातील गौरव शुक्ला नावाच्या विद्याथ्र्याने आई व बहीण घरातील कामात व्यस्त असताना स्वत:वर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून आई व बहीण खोलीत दाखल झाल्यानंतर त्यांना गौरव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रायफल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक अखिलेश मीना यांनी दिली.
चिमुकल्याने स्वत:वरच झाडली गोळी.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:28
Rating: 5