Breaking News

जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर.


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- स्व. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन बाळापुर अकोलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. दि. ८ जानेवारी रोजी या स्पर्धा पार पडल्या होत्या. या स्पर्धेत मुकेश जुगा पल्ले, (ओम गुरुदेव इंग्लिश मेडियम स्कूल कोकमठाण), अनुष्का प्रमोद कुदळे (गौतम पब्लिक स्कूल), हरेष मोतीराम गोतारणे (ओम गुरुदेव आत्मरूप) आदित्य डुचे (आत्मा मलिक इंटरनँशनल स्कूल), महेश भाऊसाहेब पवार (न्यू इंग्लिश स्कूल काकडी), योगेश आहिरे (ओम गुरुदेव गुरुकुल) आदींसह अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धा पार पाडण्यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर नीलक, रमेश पटारे, सत्तार शेख, गोरक्षनाथ चव्हाण व संजय इटकर आदींनी पुढाकार घेतला.