मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे वैद्यकीय व्यावसायिकांची संपूर्ण माहिती असलेले एम. एम. सी. मोबाईल पमुळे वैद्यकीय व्यावसायिकांसह सामान्य जनतेला लाभ होणार आहे. या द्वारे डॉक्टरांना वैद्यकीय परवाण्याचे नुतनीकरण ऑनलाईन करता येणार आहे, तर सर्व सामान्य रुग्णास आपल्या डॉक्टरांची संपूर्ण माहिती एका क्लीक द्वारे उपलब्ध होणार आहे. देशातील पहिले मोबाईल प सुरु करणारे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे मी अभिनंदन करतो, असे उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी काढले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे वैद्यकीय व्यावसायिकांची संपूर्ण माहिती असलेले एम.एम.सी. या मोबाईल पचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.शिवकुमार उत्तुरे आणि सदस्य डॉ.अजित गोपछडे उपस्थित होते
डॉक्टरांच्या वैद्यकीय परवान्याचे नुतनीकरण होणार ऑनलाईन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:22
Rating: 5