Breaking News

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड.


अहमदनगर :- काल मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सहाजणांच्या टोळीस सापळा लावून जेरबंद केले. त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींच्या चौकशीअंती माजी नगरसेवकासह ५ जणांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली. आरोपींकडून ५ देशी बनावटीचे पिस्टल, ३० जिवंत काडतुसे, दोन स्वतंत्र्य मॅगझीन जप्त करण्यात आले आहेत.