शेवगाव :- येथील रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये इयत्ता 7 वीमध्ये शिकणार्या श्रावणी गणेश आव्हाड हिने, दिल्ली येथे झालेल्या 33 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये रोप स्किपिंग खेळामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. श्रावणीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाच्या मिळवलेल्या प्राविण्याने शेवगाव पत्रकार फाउंडेशनच्या वतीने श्रावणीचा सत्कार शेवगाव येथे करण्यात आला. यावेळी शेवगाव भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर, तालुका पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र उगलमुगले, ज्येष्ठ पत्रकार आर. आर. माने, संजय नांगरे, अशोक ससाणे, संजय लहासे, शहाराम आगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रोप स्किपिंगमध्ये श्रावणी आव्हाड गोल्डची मानकरी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:48
Rating: 5