भायगाव परिसरात मुलींच्या जन्म दरात वाढ
भातकुडगाव :- भारतामध्ये पुर्वीपासुन पुरूष प्रधान संस्कृती असल्यामुळे आपल्याकडे मुलींच्या जन्माविषयी समाजामध्ये उदासिनता दिसून येत असे, मुलांचा जन्मदर आणि मुलींचा जन्मदर यामध्ये अत्यंत तफावत दिसून येत होती, दरम्यानच्या काळामध्ये स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण देखील वाढले होते, मुलगी जन्माला आली तर तीला परक्याचे धन म्हणून हिनवले जात होते, परंतु खेड्यापाड्यांमध्ये स्त्री जन्माचे स्वागत होत असल्याची परिस्थिती दिसत आहे, आज काहीशी परिस्थिती सुधारलेली दिसुन येत आहे.
शेवगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भातकुडगाव अंतर्गत 13 गावातील मुलींच्या जन्मदरा मध्ये सरासरीत 2017 मध्ये वाढ झाली आहे. 1 हजार मुलांमागे 921 मुली असा जन्मदर आल्या आहेत या सरासरीत वाढ झाल्याने स्त्रीजन्माचे स्वागतच होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र भातकुडगाव अंतर्गत येणार्या 13 गावचा अनुक्रमे भायगाव, भातकुडगाव , सामनगाव, मळेगाव, वडुले बुद्रुक, लोळेगाव, बोडखे, ताजनापूर, खुंटेफळ, जुने दहिफळ, नवे दहिफळ, लाखेफळ व विजयपूर या गावांचा समावेश आहे.
भायगावमध्ये मुले 9 व मुली 11, मळेगाव मुले 11 मुली 16, खुंटेफळ मुले 5 मुली 15 ,लाखेफळ मुले 6 मुली 10 या गावामध्ये मुलींची सरासरी मुलांहून अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत भायगाव मध्ये मुलिंची सरासरी वाढली आहे. यापुर्वी या गावांमध्ये मुलींचे जन्म दर प्रमाण नगण्य होते. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भातकुडगाव मध्ये 44 मुले आणि मुलींची संख्या 29 आहे, सामनगावमध्ये मुले 16 आणि मुली 15, वडुले बुद्रुक गावामध्ये 25 मुले आणि 14 मुली, जुने दहिफळ मध्ये 31 मुले व 29 मुली, बोडखे मध्ये मुले 11 व मुली 10 असे मुलींचे प्रमाण वाढत आहे. उर्वरित गावामध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. यापुढे स्त्री जन्माची चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे. काही संस्था व संघटना यामध्ये उत्तमरित्या जनजागृती करत आहेत. त्यांचेही समाजातील विविध घटकातून स्वागत होत आहे.
