Breaking News

राळेगणसिध्दी, हिवरेबाजारनंतर आठवड गावाची आदर्श व समृध्दीकडे वाटचाल

नगर तालुका प्रतिनिधी : नगर तालुक्यातील आठवड येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन व आठवड गावाची आदर्श गावाकडे वाटचाल हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, डॉक्टर संजय कळमकर व उद्योजक विजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे हे होते तर प्रास्ताविक मुस्तफा मन्यार यांनी केले .


या कार्यक्रमादरम्यान बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर परदेशी म्हणाले नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व आठवड गावाने केलेल्या कार्यक्रमाचे कार्य कौतुकास्पद असून यामुळे पत्रकार, पोलिस आणि जनता तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय घडून यांच्यामधील दुरावा नक्कीच दूर होईल तसेच गावातील ह्या विकास कामांची माहिती सर्वच जिल्ह्यापर्यंत जाईल आठवड ग्रामपंचायततर्फे राबवले जाणारे उपक्रमांमुळे एक दिवस हे गाव नक्कीच राज्यांमध्ये प्रसिद्धीस येईल असे मत व्यक्त केले कार्यक्रमांमध्ये डॉक्टर संजय कळमकर, उद्योजक विजय मोरे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, बांधकाम विभाग उपअभियंता सतीश भागवत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमादरम्यान बोलताना दैनिक लोकमंथनचे चे संपादक अशोक सोनवणे म्हणाले की आठवड गावने परिसरातील इतर गावांसह तालुक्यात एक आदर्श निर्माण करत गावांमध्ये विकासकामे रुजू करण्यात सुरुवात केली आहेत आठवड गावच्या विकासासाठी दैनिक लोकमंथन नेहमीच पाठपुरवठा करणार असून गावक़र्‍यांच्या अडचणींना बातमीद्वारे वाचा फोडणार आहेत.

या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर संजय कळमकर म्हणाले इतर गावांनी आठवड गाव ज्या दृष्टीने विकास कामांकडे लक्ष देत आदर्श गावाकडे वाटचाल करत आहेत त्या दृष्टीने तालुक्यातील सर्व गावांनी या दृष्टीने प्रयत्न करून आपल्या गावाचे नाव तालुक्यात नव्हे तर राज्यात चमकवले जाईल यासाठी प्रत्येक व्यक्तीने गावाच्या विकासाची सुरुवात आपल्यापासून केली तर नक्कीच ते गाव आदर्श गावाकडे वाटचाल करण्यास सुरुवात करेल असे म्हणाले
यावेळी कार्यक्रमामध्ये नगर तालुका पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अन्सार शेख, उपाध्यक्ष देव गोरे सचिव बाळासाहेब गदादे, कार्याध्यक्ष सोहेल मनियार, शरद कासार ,संदीप पवार, बाळासाहेब बडे, खासेराव साबळे, नगर तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज कोकाटे श्याम घोलप, संदीप सुरवसे माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब सदाफुले, नगर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर, उपसभापती प्रवीण दादा कोकाटे, आठवड गावाचे सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच बीएस लगड ,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे पापामिया पटेल, युवक उपाध्यक्ष श्याम कांबळे सुधीर दादा आदींसह मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आठवड गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : सोनवणे
आठवड या गावाने राळेगणसिध्दी, हिवरेबाजारनंतर आपला एक आदर्श निर्माण केला असून, एक स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्टया समृध्द म्हणून आठवड गाव आपला विकास करत आहे. या विकासासाठी दैनिक लोकमंथन नेहमीच पाठपुरावा करणार असून, गावाच्या विकासासाठी नेहमीच विकासात्मक पत्रकारिता करून, गावकर्‍यांच्या अडचणींना बातमीद्वारे वाचा फोडण्याचे आश्‍वासन यावेळी दैनिक लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे यांनी दिले.