Breaking News

दुर्गवीर प्रतिष्ठान करणार किल्ले रामगडची स्वच्छता

सिंधुदुर्गनगरी,, दि. 25, जानेवारी - दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या 26 आणि 27 जानेवारीला किल्ले रामगडवर स्वछता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सर्व इतिहास प्रेमी व गड किल्ले प्रेमी यांनी ह्या कार्यात सहभाग घेऊन आपला हा अमुल्य ठेवा जतन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे .


महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात इतिहास दडलाय आणि हाच इतिहास ज्या गडकिल्यांवर घडला आहे ते गड किल्ले आज ढासळत आहे , अखेरचा श्‍वास घेत आहेत. गड किल्यांच्या ह्या अवस्थेला लोकांचे गडांकडे झालेले दुर्लक्ष हे एक कारण आहे तर दुसरे कारण आहे इतिहास आणि गड किल्ले ह्याचे महत्त्व लोकांना पटले नसल्यामुळे. 
गड संवर्धन होणे ही काळाची गरज आहे हे ओळखून काही दुर्गवीर प्रमुख संतोष हसुरकर आणि काही तरुण एकत्र आले आणि दुर्गवीर ह्या संस्थेचा जन्म झाला. महाराष्ट्रातील गडांचे संवर्धन व्हावे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेऊन गड परिसरातील आदिवासी भाग ह्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दिवाळीच्या वेळी गृह उपयोगी साहित्य वाटप उदा. ज्या भागात लाईट नाही अशा भागात सौर दिवे वाटप, जेवणाच्या ताटांचा संच, पाणी शुद्धीकरण यंत्र वाटप, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागात राबवत असतात .