मुंबई शहरातील विविध नागरी योजनांसाठी ११६ कोटी ८१ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
मुंबई शहराची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात पार पडली. यावेळी बैठकीस समितीचे अध्यक्ष तथा मुंबई शहराचे पालक मंत्री सुभाष देसाई,खासदार अरविंद सावंत, खासदार राहूल शेवाळे, आमदार राज पुरोहित, आमदार वर्षा गायकवाड, आमदार वारिस पठाण, आमदार अमिन पटेल़, महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान, मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे, बेस्टचे महाव्यवस्थापक एस.के. बागडे आदीसह अधिकारी-कर्मचारी आणि आमदार, नगरसेवक उपस्थित होते.
