Breaking News

आरटीआय अर्जदाराला सुरक्षा पुरवा.


नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने हरियाणा पोलिसांना आरटीआय अर्जदाराला सुरक्षा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य विमा कॉर्पोरेशनमध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी माहिती मागविणाऱ्या एका अर्जदाराला जीव मारण्याचा धमक्या आल्या होत्या. यानंतर हरिंदर ढिंग्रा नामक अर्जदाराने आयोगाकडे धाव घेतली होती. ढिंग्रा यांनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये झालेल्या घोटाळ्यासंबंधीची माहिती मिळविण्यासाठी ५ जानेवारी रोजी अर्ज केला होता. यानंतर अनेकांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.