Breaking News

अपघातात भाजपाच्या महिला खासदार जखमी .


रायपूर : छत्तीसगडमधील भाजपच्या महिला खासदार कमला देवी पाटली अपघातात उजव्या हाताचे हाड मोडल्याने जखमी झाल्या. रविवारी त्यांच्या वाहनाने पाठीमागून एका ट्रॅक्टरला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून प्रकृती ठीक असल्याचे पोलिसांनी सांगितले. कमला देवी यांच्या पतीसह वाहनातील इतर चौघे सुखरूप बचावले. अपघातातील टॅ्रक्टर जप्त करण्यात आले. फरार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू आहे.