Breaking News

फत्याबादच्या उपसरपचाविषयी उत्सुकता


श्रीरामपूर ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील राजकीयदृट्या मह्तवपूर्ण समजल्या जाणाऱया फत्याबाद ग्रामपंचातची उपसरपंच निवड मंगळवारी {२३} होणार आहे. उपसरपंचपदासाठी तीनही पॅनलकडे बहुमत नाही. वरखड गटाचे चार सद्स्य आहेत. बाबासाहेब आठरे गटाचे तीन सदस्य आणि दत्तात्रय खेमनर गटाचे दोन सदस्य आहेत. त्यामुळे कोणता गट कोणाला साथ देतो, कुठल्या गटाचा उपसरपंच होतो, याकडे संपूर्ण गावात मोठी उत्सुकता झाली आहे.