गारवाड येथे वाळू उपशावर कारवाई, पर्यावरण कलमान्वये 25 जणांवर गुन्हे
सोलापूर, - पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने कारवाई करून पाच जेसीबी, सहा ट्रॅक्टर ट्रॉली, चार हायवा गाड्या जप्त केल्या. यात 22 ब्रास वाळू जप्त केली आहे. एकूण एक कोटी 50 लाख हजार असा वाळू वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. 25 जणांवर माळशिरस पोलिसांत सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र वायकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
गारवाड (ता. माळशिरस) येथील भांडे मळा येथे ओढ्यात धाड टाकून कार्यवाही केली. कलम 379, 353, 34 सरकारी कामात अडथळा आणला. पर्यावरण कलम 915 नुसार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आबा सरगर, दादा लवटे, आदित्य सुतार, धनाजी नाईकनवरे, नवनाथ खांडेकर, दयानंद बुधावले, अजय भांडवले, कुमार वाघमारे, दत्ता कांबळे, सर्जेराव सरगर, संजय चव्हाण, सचिन मदने यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली. तर महादेव वाघमोडे, गौतम माने, बापू माने, सचिन पडळकर, सचिन मदने, संजय चव्हाण, सर्जेराव सरगर महिंद्रा, सोनालिका ट्रॉक्टर, दोन जेसीबीचे हायवा टाटा या गाड्यांचे चालक फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या वाळू चोरीच्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुर्वे करीत आहेत.