Breaking News

मुद्रा लोन नाकारल्याने महिलेचे उपोषण


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी :- मुद्रा कर्जप्रकरणी झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी आणि न्याय मिळावा. यासाठी येथील महाराष्ट्र बँकेच्या शिवाजी रोडवरील शाखेसमोर सरस्वती बिदरवडे या सकाळपासून उपोषणास बसल्या आहेत. बिदरवडे यांना या बँकेने मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
यासंदर्भातर बिदरवडे यांनी सांगितले, की त्या येथील रहिवासी असतानादेखील बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रहिवासी नाही, असे भासवून मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्याकडे रहिवासी असल्याबाबतचे पुरावे आहेत. तरीसुद्धा त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्या बँकेत चकरा मारत आहेत. बँकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन लोन देण्यास नकार देत आहेत. मागील दहा महिन्यांपासून अधिकाऱ्यांनी चकरा मारायला लावल्या आहेत. तरीही कर्ज दिले जात नाही. त्यांनी कागदपत्रांची पूर्ततादेखील केली आहे. या अन्यायाविरुद्ध त्यांनी उपोषण युरु केले.