औद्योगिक वसाहतीतील भंगारच्या गोदामाला आग.
औरंगाबाद- शहरातील वाळूज पंढरपूर औद्योगिक वसाहतीतील भंगारच्या गोदामाला सकाळी नऊ वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसी, महापालिका आणि अन्य एक अशा तीन अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, या गोडाऊ नमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास अडचण निर्माण होत आहे. गेल्या दोन ते अडीच तासापासून अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग भीषण असली तरी आगीत जीवितहानी झाल्याची कुठलीही माहिती अद्याप प्रशासनाकडे नाही. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचा फौजफाटा दाखल झालेला आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.