Breaking News

शिक्षण देणारी शिक्षणाची पंढरी उभारणार : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- माजी खा. स्व. शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी कर्मवीर एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गौतम पब्लिक स्कुल सुरु केले. या एज्युकेशन सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर होऊन ही संस्था आज कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी या नावाने ओळखली जाते. या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालय, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व विविधमाध्यमिक विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले शिक्षणाचे स्वप्न करीत आहेत. मात्र यावरच थांबणे संयुक्तिक नाही. भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून एकाचवेळी १५ हजार विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील, अशी शिक्षण पंढरी उभारणार असल्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, युवा नेते आशुतोष काळे केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये गौतम फेस्टिव्हलच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.