Breaking News

ग्रामसेवकांनी दुपारी आवश्यकता असेल तरच पंचायत समितीमध्ये येण्याचे आदेश


कर्जत /प्रतिनिधी/--ग्रामसेवक गावात भेटत नाहीत. या सातत्याने विविध गावातील तक्रारीवर कर्जत पंचायत समितीने नामी शक्कल लढविली असून, यामुळे सर्व ग्रामसेवक दररोज गावातच भेटू शकणार आहेत. 
गाव पातळीवरील ग्रामपंचायत ही सर्वात महत्वाची पंचायती राज मधील संस्था आहे. या कार्यालयाकडे ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाचे काही ना काही काम असतेच. मात्र अनेक ग्रामसेवक तालुक्याच्या गावी बोलावलेच्या नावाखाली आपल्या नियुक्तीच्या गावाकडे फिरकतच नव्हते. एखाद्या ग्रामस्थांनी विचारलेच तर सरळ पंचायत समितीमध्ये होतो. असे म्हणून वेळ मारून नेली जात होती. तर अनेक ग्रामसेवकाचा पंचायत समिती हा सतत दिसण्याचे ठिकाणच होते. यामुळे अनेक गावातून सातत्याने ग्रामसेवक भेटत नाहीत अशा तक्रारी येत होत्या. तर अनेक गावचे व तालुक्याचे पदाधिकारी ही अशा तक्रारी करत असत.

यावर कर्जत पंचायत समितीच्या सभापती पुष्पा बापूराव शेळके व उपसभापती प्रशांत बुद्धीवंत यांनी गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांचेसह सर्व पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेऊन सर्व ग्रामसेवकांनी दुपारी 2 वाजे नंतरच आवश्यकता असेल तरच पंचायत समितीमध्ये यावे असा आदेश काढून अत्यंत चांगला निर्णय घेतला. यामुळे प्रत्येक ग्रामसेवक दुपारी 2 वाजे पर्यंत तरी आपल्या नियुक्तीच्या गावात आढळून येणार आहेत. अशा पद्धतीने खूप थोड्या लोकांमुळे असा कठोर निर्णय घ्यावा लागला असल्याचे गट विकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी सांगताना अनेक ग्रामसेवक चांगले काम करणारे आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे प्रत्येक ग्रामस्थाला ग्रामसेवक हे भेटणारच आहेत असे म्हटले. आपले सरकार केंद्र, कर वसुली, सेवा हमी कायदा, १४ वा वित्त आयोगाची कामे व इतर सर्व कामे पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने नियोजन आम्ही करत आहोत. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील मासिक मिटिंग सोडून इतर सर्व मिटींग ही आम्ही दुपारी दोन नंतरच घेणार आहोत. मात्र प्रत्येक महिन्याला असलेल्या दोन मासिक मिटिंग पुरता हा नियम शिथिल करण्यात आला असल्याचे ही त्यानी सांगितले. कर्जत तालुक्यात शासकीय काम अत्यंत शिस्तबध्द व्हावे. दृष्टीने कामकाज केले जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. असून त्यास सर्व ग्रामसेवक पंचायत समितीचे सर्व अधिकारी व पदाधिकारी याचे सहकार्य लाभत असल्याचे ही म्हटले