Breaking News

सायबर सुरक्षा विषयावर वार्तालाप

सिंधुदुर्गनगरी, दि. 25, जानेवारी - सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सायबर गुन्हे शाखा आणि सिंधुदुर्ग जिल्हा माहीती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रांसफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत सायबर सुरक्षा विषयावर पत्रकार वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात करण्यात आले होते. 


जसे जसे सोशल मीडिया हताळण्याच प्रमाण वाढत आहे तसे तस सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढत प्रमाण आणि गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यात येणार्‍या समस्या लक्षात घेता थोड़ी सावधानता बाळगल्यास या गोष्टी टाळता येऊ शकतात. त्यासाठी जनजागृती महत्वाची ठरेल. आपण माध्यमांचे प्रतिनिधी आहात आणि माध्यम समाजाचा आरसा असतात. शॉर्टकट मार्गाने पैसा कधीही मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही ऑनलाइन प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगड़े यानी यावेळी बोलताना केले. या वार्तालाप कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बंदिवडेकर, सायबर सेल प्रमुख उपनिरीक्षक स्वप्निल पवार आ णि पत्रकार उपस्थित होते.