Breaking News

गडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी - वित्तमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी


नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी 535 कोटी रूपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली.
नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयात श्री.मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. श्री.मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्याची सविस्तर माहिती देत सांगितले,गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित असून हा जिल्हा आदिवासीबहुल तसेच सामाजिक-आर्थिक मागासलेला आहे. गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्येच्या 34 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. येथील मानव विकास निर्देशांक 0.20 असून या निर्देशांकाचा क्रमांक राज्यात 34 वा असल्याचे सांगितले. राज्याचे दरडोई उत्पन्न 98000 आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्त्पन्न 47 हजार आहे. तसेच शिक्षण घेण्याचे प्रमाण 11 टक्के असल्याची वस्तुस्थिती केंद्रीय गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली.