मुंबईत सरस महालक्ष्मी प्रदर्श, विविध कलाकुसरीच्या वस्तू खरेदीची मुंबईकराना संधी - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
हे प्रदर्शन एमएमआरडीए मैदान, प्लॉट क्रमांक 19 ते 22, वांद्रे - कुर्ला संकुल, मुंबई येथे 17 जानेवारी ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजता या कालावाधीत खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य असेल. या प्रदर्शनाचे उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्या दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. होणार आहे, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दरवर्षी या प्रदर्शन,विक्री आणि राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
