Breaking News

गावोगावी आरोग्य शिबीरांची गरज : नरसाळे


आजच्या धावपळीच्या युगात शरिराची काळजी घेणे गरजेचे असून गावोगावी आरोग्य शिबीरे राबविण्याची गरज आहे, असे वक्तव्य भाजपाचे कार्यकर्ते बाळासाहेब नरसाळे यांनी व्यक्त केले. गोरेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ईव्हॅनजेलीन बुथ हॉस्पीटलतर्फे मोफत सर्वरोग निदान शिबीर गोरेगाव येथे श्री हॉस्पीटलमध्ये आयोजित केले होते. यावेळी नरसाळे बोलत होते. या शिबीरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीराचे आयोजन देवानंद जाधव, मंथन पब्लिक स्कूलचे अध्यक्ष व भाजपा कार्यकर्ते बाळासाहेब नरसाळे, श्री हॉस्पीटलचे डॉ.एम.बी. तांबे यांनी केले होते. रुग्णांची मोफत तपासणी करुन 35 जणांना मोफत श्रवण यंत्रे देण्यात येणार असल्याचे डॉ.तांबे यांनी सांगितले. यावेळी डॉ. शालीनी उजागरे, इजि. देवानंद जाधव, गोरख पवार, विकास पारखे, आमोल पांडुळे, सिस्टर स्नेहल व सहकारी उपस्थित होते